तालुका

ग्रामपंचायत कांबळे मधील जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे 11 कोटी 58 लाखाचा निधी झाला मंजूर

 

अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड

ग्रामपंचायत कांबळे तर्फे महाड मध्ये जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले, सुमारे 11 कोटी 58 लाखाचा निधी मंजूर झाला, या योजनेच्या कामाचा शुभारंभ आज आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाड तालुक्यातील, विभागातील शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कांबळे ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे खूप आभार मानले.

आमदार भरतशेठ गोगावले यांनी उपस्थितांना सांगितले की तुमचा खराब झालेला अंतर्गत रस्ता देखील दोन महिन्यात मार्गी लावून देण्यात येईल तसेच महाड विधानसभा मतदार संघात आपण जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची योजनांना मंजुरी आणलेली आहे, एक ही गाव वाडी वस्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही असे नियोजन आपण केलेले आहे, काही लोक या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याचा काही उपयोग होणार नाही आपण आपले काम करत राहू.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, पंचायत समिती मा सभापती सपना मालुसरे, संपर्क प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, उपतालुका प्रमुख झांजे, सरपंच राघोबा महाडिक, उपसरपंच अतिश शिंदे, भरत शिंदे, सलामभाई जुवले, तसेच गावातील आणि मोहल्ल्या मधील ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!