ब्रेकिंग

महाड शहर व तालुक्यातील जुगार, मटका अड्डे त्वरीत बंद करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

अवैध धंदे बंद न केल्यास २३ ॲागस्टला आंदोलन छेडण्याचा इशारा

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

 

महाड: महाड शहरांमध्ये व तालुक्यामध्ये गेल्या कांही महिन्यांपासून रायगड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशा वरुन जुगार तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणामध्ये आणण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये महाड शहरसह तालुक्यात जुगार, अवैद्य धंदे सुरु झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येत्या 22 ऑगस्ट पर्यंत हे अवैध धंदे बंद न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा युवा अधिकारी दक्षिण रायगड चेतन पोटफोडे यांनी महाड शहर पोलिसांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महाडमध्ये शहराच्या मध्यवर्ती वसाहतीमध्ये खुले आम सुरु असणाऱ्या जुगार आणि अवैद्य धंद्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित झाला आहे. महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी काळे यांनी बेकायदेशीर जुगार, मटका धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशा वरुन जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामिण भागांतील कायदा आणि सुव्यस्था राखण्या करीता कांही महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये बेकायदेशी धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आहेत, असे असताना जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसुन येते.

महाड शहरात तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात जुगार, मटक्याचे अवैध धंदे व्हिडिओ गेम सारख्या अवैध धंदे बाजारपेठेत व भर वस्ती खुलेआमपणे सुरू आहेत ज्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी व महिला जातात त्याच रस्त्यांवर अवैधरित्या खुलेआम पणे चालू असणाऱ्या मटका जुगार यांना प्रतिबंध करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा युवा अधिकारी दक्षिण रायगड चेतन पोटफोडे यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे व उपाध्यक्ष काळे यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा देऊन हे धंदे तातडीने बंद न झाल्यास 23 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाड शहर पोलीस ठाण्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी वाहतूक सेनेचे सुभाष मोरे, माजी नगरसेवक संदीप जाधव, सुरेश कळमकर, धनंजय देशमुख, मंगेश देवरुखकर आणि पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!