रा. जि. प. शाळा गांधारपाले आदर्श शाळा म्हणून घोषित
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : – रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा-गांधारपाले या शाळेस नुकतेच रायगड जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक वर्ष २०२२/२३ साठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रूपये पन्नास हजार देवून संपूर्ण महाड तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेवून या शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले पदवीधर शिक्षक श्री. प्रकाश धर्मा धाटावकर व या कामी त्यांना सतत साथ देणान्या त्यांच्या पत्नी सौ. मानसी धाटावकर यांच्या अविरत परिश्रमाने व श्रीमती निरजा नितीन कुद्रीमोती प्रकल्प अधिकारी एन. आर. इस्पात ॲन्ड पावर (प्रायवेट लिमिटेड), छत्तीसगड यांच्या अमूल्य आर्थिक साहाय्यातून शाळेस संगणक संच, सी.सी. टि. व्ही. प्रोजेक्टर, वेब कॅमेरा साउंड सिस्टीम, एल.ई.डी, २४ तास इंटरनेट सुविधा अशा सर्व सोयींनी शाळा सुसज्ज झाली असून महाड तालुक्यातील पहिली व्हर्च्युअल शाळा म्हणून बहुमान मिळवला आहे.
गावामध्ये उन्हाळी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असते.- त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून शाळेतील होतकरू शिक्षक श्री. प्रकाश धाटावकर यांच्या अविरत परिश्रमातून व ग्रीन सोल फाऊंडेशन मुंबई यांच्या आर्थिक “साहाय्यातून शाळेस नुकतीच बोअरवेल सुविधा पुरविण्यात आली आहे. सरांच्या उत्तम नियोजनामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचा पाणी प्रश्नही कायमस्वरूपी सुटला आहे.
ग्रामपंचायत गांधारपाले यांचे वेळोवेळी शाळेला सहकार्य मिळत असून ग्रामपंचायत सरपंच मा. श्री. नामदेव पवार व सर्व सदस्य यांच्या योगदानामुळे नुकतेच एक लाख रुपये निधी खर्य करून शाळेची छप्पर दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच शाळेस इंटरनेट सुविधा चालू ठेवण्यासाठी लागणारी वार्षिक खर्चाची तरतुद व विधार्थ्यांच्या विविध कलागुणदर्शनासाठी होणारी वार्षिक खर्चाची तरतूद ग्रामपंचायतने कायमस्वरूपी केली आहे.
शाळेतील शिक्षकांच्या सतत प्रयत्नामुळे एम. एम. ए. महाड यांच्या कडून शाळेस एक संगणक संच व प्रिंटरची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच नामदेव पवार व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, तसेच शाळेला वेळोवेळी सहकार्य करणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सहदेव उतेकर, उपाध्यक्षा सौ. साक्षीताई बाईत , मुख्याध्यापक सौ. प्रणिता माळवदे, उपशिक्षिका सौ. किशोरी पाथरे, पदवीधर शिक्षक प्रकाश धाटावकर, सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व तरुण मंडळ, सर्व पालक वर्ग यांच्या सर्वांच्या योगदानामुळे साकार झालेल्या या आदर्श व व्हर्च्युअल शाळेचे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात असून येथे कार्यरत असलेल्या गुणी शिक्षकांचे सर्वाकडून कौतुक केले जात आहेत.



