शहर
महिला पोलिस कर्मचारी यांचा सत्कार
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड: माऊली महिला मंडळ कवे आळी यांच्या कडून कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी यांचा सत्कार करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. अनेक संकट व रात्र दिवस काम करून आपली सेवा बजवत सामान्य जनते ची ती आई भवानी च्या रूपाने रक्षण करते आणि अश्या महिला अधिकारी यांचा सत्कार हा आमच्या हस्ते झाला हेच आमच्यासाठी माणिक मोती दुसरं काहीच नाही असे मंडळातील महिला यावेळी म्हणाल्या.
तसेच कवे आळी मित्र मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या कडून लाईफ जॅकेट मंडळा ला देण्यात आले.



