माणगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
माणगाव : 09 जानेवारी 2024 रोजी माणगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, रायगड जिल्हाप्रमुख अनिलजी नवगणे, महाड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल (दिदी) माणिक जगताप, रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख ज्योत्स्ना दिघे, महाड विधानसभा संपर्क प्रमुख स्वातीताई दबडे, रायगड जिल्हा संघटीका डॉ. स्विटी गिरासे, संपर्क संघटक स्वाती घोसाळकर, संपर्क संघटक कविता नलावडे, सायली सुगदरे, रायगड जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, रायगड जिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, चंद्रकांत पवार, बळीराम घाग, महाराष्ट्र राज्य विस्तारक सुधीर ढाणे, संपर्क प्रमुख संजय साखले, सह संपर्क प्रमुख भरत देवघरे, सतीश शेलार, सिताराम मेस्त्री, प्रभाकर ढेपे, अक्षय कदम, जनार्दन मानकर, शिवाजी गावडे, अजित तारलेकर, रोहीत पारधे, रणजित मालोरे, वलिद भाई, सुजित तांदळेकर, प्रभाकर मानकर, सुरेश उंडरे, मच्छिंद्र लाड, अजिंक्य जाधव व सर्व मान्यवर उपस्थित होते.



