जिल्हा

आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान करंजाडी येथे संपन्न 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : दि. ३० ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान सन. २०२३-२०२४ करंजाडी मांडवकर कोंड येथे संपन्न झाला.

महाड तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा विन्हेरे विस्तारीत कक्ष नागाव शाखेच्या वतीने करंजाडी मांडवकर कोड येथे नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील बचतगटातील महिला व शेतकरी यांच्या करिता आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यत आले होते.

उपस्थित महिलांना बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर यांनी बँकेच्या विविध योजनाची माहिती दिली तसेच बचत गटाच्या महिलांना कर्ज देखील देण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलाना सक्षम करण्यासाठी विविध व्यवसायासाठी कर्ज देण्यात येईल असे सांगण्ययात आले.

तसेच शेतकऱ्यांना देखील शेती विषयी लागणाऱ्या कर्जाची माहिती देण्यात आली, पंतप्रधान जीवन ज्योति योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पीएम किसान योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी कर्ज वाटप योजनांची माहिती उपस्थित सर्व शेतकऱ्यांना देण्यात आली. आपल्या भागात बैंक आल्याने ग्राहकांनी महिला वर्ग व शेतकरी वर्गाने योग्य तो लाभ घेऊन बँकेला सहकार्य करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साळुंखे यांनी केले व आभार समाज कार्यकर्ते अमृत मांडवकर यांनी मानले.

या वेळी व्यासपीठावर बँकेचे शाखाधिकारी नितिन चांदोरकर, कॅशियर चंद्रकांत मेंगाळ, गावातील अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, भरत गोलांबडे, अमृत मांडवकर, महिला अध्यक्षा अनीता मांडवकर, अश्विनी वनगुले, महिला व शेतकरी वर्ग ई. मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!