अलिबाग साखर गावातील परप्रांतीय मच्छिमाऱ्यांनी एकदरे गावामधील मच्छिमाऱ्यांना रॉड च्या सह्याने मारले आणि बोट देखील तोडण्याचा केला प्रयत्न
यांच्या निषेधार्थ मुरुड - जंजिरा मधील सर्व कोळी बांधवांनी भैय्या हटाव मोर्चा काढून केली तक्रार
शरद चाफेकर – ग्रामीण प्रतिनिधी मुरुड – जंजिरा
मुरुड – जंजिरा: कोळी बांधव यांचा एकमेव व्यवसाय म्हणजे मच्छि मारणे आणि त्यापासून मिळणाऱ्या पैशामधून परिवाराचा उदरनिर्वाह करणे. हे करत असताना अनेक अडचणींना नेहमी सामोरे जावे लागते. मच्छिमारी करत असताना बोट घेऊन समुद्रामध्ये खूप आत मध्ये जावे लागते.
असेचे समुद्रामध्ये खूप आत मध्ये मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या मुरुड – जंजिरा तालुक्यातील एकदरे गावामधील कोळी बांधव दुर्वा गोपाळ लोदी आणि सहकारी गेले असता अलिबाग मधील साखर गावातील परप्रांतीय मच्छिमाऱ्यांनी दुर्वा गोपाळ लोदी आणि त्यांचे 15 सहकारी यांना रॉड च्या सह्याने मारले आणि बोट देखील तोडण्याचा प्रयत्न केला.
परप्रांतीय मच्छिमाऱ्यांनी केलेल्या कृत्याचे सर्व लोकल मच्छिमाऱ्यांनी विरोध केला असून शासनाने या गोष्टीकडे गंभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
यांच्या निषेधार्थ मुरुड – जंजिरा मधील सर्व कोळी बांधवांनी भैय्या हटाव मोर्चा काढून शासकीय अधिकारी यांच्याकडे झालेल्या घटना वारंवार होऊ नये आणि काहीतरी कार्यवाही करावी याकरिता लेटर देखील देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय गिदी, पांडुरंग आगरकर, जगन वाघरे, चिता लोदी, अरुण मडवी, रामदास जिशानदार आणि राजपुरी, एकदरे आणि मुरुड मधील सर्व समाज बांधव उपस्थित होते.



