हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान
अभिजीत ढाणिपकर – उपसंपादक कोकण विभाग
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
राज्याच्या आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे असताना निर्णय घेऊन सुरू केलेले हे पुरस्कार कोरोना कालखंडामुळे कुणालाही देता येणे शक्य झाले नव्हते, मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आजच्या सुदिनी हा कार्यक्रम संपन्न झाला. असे पुरस्कार हे चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा देतात त्यामुळे अशा सोहळ्यांचे दरवर्षी आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
त्यासोबतच आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाच्या पहिल्या चरणाचे लोकार्पण आज करण्यात आले या माध्यमातून राज्यभरातील ४ कोटींहून अधिक महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. पहिला टप्पा यशस्वी केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ देखील आज करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यातील ० ते १८ वयोगटातील मुले आणि मुलींच्या आरोग्य तपासणीसाठी “बाल सुरक्षा अभियाना” चा शुभारंभ देखील यासमयी करण्यात आला.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभाग १ चे प्रधान सचिव संजय खंदारे, आरोग्य विभाग २ चे प्रधान सचिव नवीन सोना, आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार, आरोग्य संचालक पुणे डॉ. अंबाडेकर, आरोग्य संचालक मुंबई डॉ.स्वप्नील लाळे तसेच आरोग्य विभागाचे सह संचालक, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
