तालुका

नवनिर्वाचित प्रांतअधिकारी बाणापुरे आणि तहसीलदार शितोळे यांची मा. रा.जी.प. सदस्य मनोज काळीजकर यांनी घेतली भेट

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

महाड : महाड येथील नवनिर्वाचित प्रांतअधिकारी बाणापुरे व नवनिर्वाचित तहसीलदार शितोळे यांची यांना मा. रा.जी.प. सदस्य मनोज काळीजकर यांनी भेट घेतली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तळीये पुनर्वसन, या मधील स्मारक उभारणीची मंजुरी, मोहोत गावातील भिवगर गावाच्या पुनर्वसन प्रश्न, कोथेरी येथील तांदळेकरवाडी आणि जंगमवाडी, काळीज मधील लक्ष्मी आदिवासीवाडी, आंबेशिवथर मधील सह्याद्रीवाडी आणि आंबेनळी तसेंच इतर अती धोक्याच्या वाड्या वस्त्या बाबत पुनर्वसन बाबत व सुविधा देण्याबाबत चर्चा करण्यात देखील या वेळी करण्यात आली.

मा. रा.जी.प. सदस्य मनोज काळीजकर यांनी या वेळी आपल्या विभागातील पावसाचा आढावा घेऊन पावसापूर्वी नदीलगत होणाऱ्या गावांचा आढावा घेऊन त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा करून पुनर्वसन निवारा शेडच्या तपशीलची पडताळणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!