कृषीवार्ता

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एकचा गळीत हंगाम रोलर पूजन कार्यक्रम संपन्न

 

दशरथ थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर 

पिंपळनेर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एकचा गळीत हंगाम रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

मिल रोलरचे पूजन बबनदादा यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे पुढील गाळप हंगाम २०२३-२४ ची पूर्वतयारी सुरू असून, साखर कारखान्याचे मागील वर्षाचे 2022-23 गळीत हंगामामध्ये 18 लाख 41 हजार 420 मे टन उसाचे गाळप करून 11.33% साखर उताऱ्याने सोळा लाख 52 हजार 800 क्विंटल साखर उत्पादित केले होते, 2022-23 गळीत हंगामातील एक महिन्याचा पगार बँक खात्यात वर्ग करण्यात आला.

यावेळी संचालक विक्रम सिंह, शिंदे, पोपटमामा चव्हाण, प्रगतशील बागातदार तानाजीराव पाटील, कार्यकारी, संचालक एस एन डिग्रेजे व सर्व अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!