माणगाव तालुक्यामध्ये विविध कामाचे भूमिपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते
अक्षय जाधव – शहर प्रतिनिधी माणगाव
माणगाव तालुक्यातील मौजे उमरोली येथे नळ पाणी पुरवठा योजना, मौजे बोरघर येथे नळ पाणी पुरवठा योजना तसेच, मौजे सुरव तर्फेतळे येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इकबालशेठ धनसे, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, महादेव बक्कम जेष्ठनेते, शैलेश भोनकर पंचायत समिति सदस्य, अलका जाधव सभापती प. स. माणगाव, संगीता बक्कम महिला अध्यक्ष, नामदेव कासारे तालुका उपाध्यक्ष, राजेंद्र जाधव अध्यक्ष साईगन, अलपा जाधव सरपंच सुरव, रसिका कळबे सरपंच पेन/तळे मनिषा खडतर सरपंच खरवली, काका नवगने अध्यक्ष इंदापूर गट, दीपक जाधव सचिव महाराष्ट् प्रदेश, सुभाषशेट भोनकर, रायगड जिल्हा चिटणीस, विनोद सुतार युवा नेते, टिकम भोनकर जेष्ठनेते ऋषिकेश दसवते युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या योजनेमुळे येथील ग्रामस्थांची पाण्याची दैनंदिन गरज भागणारअसून गावांसह परिसरातील गावांना देखील शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.



