स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते तिरंगा वितरण
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
सातारा: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मुळगाव दरे गावातील ग्रामस्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते तिरंगा वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी दरे येथे आल्यानंतर येथील ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करित याप्रसंगी ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण केले. यावेळी ग्रामस्थांनी देखील आपल्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, वाईचे प्रांतधिकारी राजेंद्र कुमार जाधव, महाबळेश्र्वर तहसीलदार सुषमा पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी वनागरिक उपस्थित होते.
