ब्रेकिंग
भारतीय हवामान खात्याने दि. ५ ते ७ जुलै पर्यंत रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा
मा. नगराध्यक्षा महाड नगरपरिषद स्नेहल जगताप यांनी नागरिकांना आपत्कालीन काळात सावधगीरी बाळगण्याचे केले अवाहन
श्रीकांत गायकवाड – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : भारतीय हवामान खात्याने दि: ५ ते ७ जुलै पर्यंत रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मा. नगराध्यक्षा महाड नगरपरिषद स्नेहल जगताप यांनी महाड शहर त्याचप्रमाणे महाड–पोलादपूर–माणगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती केली की आपण सगळ्यांनी सावधानता बाळगावी. आपल्या प्रत्येकाचा जीव लाखमोलाचा आहे तो धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा.



