ब्रेकिंग
एनडीआरएफचे पथक महाड येथे दाखल
अभिजीत धानीपकर – शहर प्रतिनिधी महाड
रायगड: रायगड जिल्ह्याकरिता एनडीआरएफचे पथक महाड येथे दाखल झाले आहे. त्यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती काळामध्ये मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे.
या पथकाचे पथक प्रमुख बी महेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एकूण 23 अधिकारी–कर्मचारी महाड येथे दाखल झाले आहेत. यांच्या सहाय्याने महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद व इतर अधिकारी–कर्मचारी या भागातील आपत्ती व्यवस्थापनाचे काम अधिक सक्षमपणे करू शकतील.



