ब्रेकिंग

परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये अत्याचार

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.

धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात आरोपीने मुलीवर अत्याचार केला. ही घटना 14 जून रोजी सकाळी घडली.

पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला. आरोपीला घटनेनंतर आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचं नाव आहे.

हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान काल सकाळी 7.28 वाजता हा भीषण प्रकार घडला.

पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती.

पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरु होताच आरोपी डब्ब्यात चढला. मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरुन पळ काढला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!