देश-विदेश

ग्रीसच्या समुद्रात प्रवासी जहाज बुडाले, 79 प्रवाशांचा झाला मृत्यू, काही जण अजूनही बेपत्ता

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

युरोपातील ग्रीस या देशातील समुद्रात बुधवारी 14 जून रोजी प्रवासी जहाज बुडाल्याने 79 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

या दुर्घटनेला मागील काही काळामधील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जण बेपत्ता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे जहाज बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.

एका युरोपीय बचाव पथकाच्या माहितीनुसार, या जहाजामध्ये जवळपास 750 प्रवासी प्रवास करत होते. परंतु या जहाजामध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत अजूनही खात्रीपूर्वक माहिती समोर आली नाही.

त्यामुळे प्रशासनाकडून देखील या संदर्भात फक्त अंदाज वर्तवण्यात येत आहेत. तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 104 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. हे जहाज लिबियामधून रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!