तालुका

शासनातर्फे महामार्गावर उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्राची आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली पाहणी

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाड : मुंबई गोवा महामार्गाने कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या गणेश भक्ताच्या सोयी सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठिकठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आले असून या सुविधा केंद्रात आरोग्य कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष, पोलीस मदत कक्ष, अमृततुल्य चहा मोफत तसेच थंड एक्वागार्ड च्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुलभ शौचालय आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई गोवा हायवेवर दर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हे सुविधा केंद्र उभारण्यात आले असून महाड विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्राना आमदार भरतशेठ गोगावले यांनी भेट देऊन कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत कोकणवासियांना सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल शासनाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!