वरंध गावातील कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड तालुक्यातील वरंध गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी महाड विधानसभा मतदारसंघात असलेल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश कर्ते : शेखर देशमुख, संदीप देशमुख, अमित देशमुख, गौरव देशमुख, सचिन देशमुख अनिकेत देशमुख, वसंत देशमुख, दशरथ देशमुख, चंद्रकांत देशमुख, विशाल देशमुख, संतोष वेल्हाळ, स्वरूप गुरव, दत्तात्रेय सपकाळ, हनुमंत सपकाळ इत्यादी तरुण युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रवेश कर्त्यांचे भगवे पताका घालून पक्षात स्वागत केले, तसेच आतापर्यंत वरंध ग्रामपंचायत हद्दीत जी काही विकासकामे झाली ती शिवसेनेच्याच माध्यमातून आपण केलेली आहेत आणि तुमची जी काही उर्वरित विकास कामे असतील ती आम्ही पूर्ण करून देण्याचा आत्मविश्वास दिला, तसेच आपणास शिवसेना पक्षात सन्मानाचीच वागणूक दिली जाईल असे प्रवेश कर्त्यानी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, उपविभाग प्रमुख राजेंद्र देशमुख, पारमाची ग्राम पंचायतचे मा. सरपंच सुभाष मालुसरे, वरंध शाखाप्रमुख किरण देशमुख, आयुब कुडूपकर, सुशील देशमुख, योगेश देशमुख, प्रशांत धनावडे आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



