जिल्हा

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

विशाल मोहिते - उपसंपादक कोकण विभाग

 

रायगड : दि.3 मधसंचालनालय, महाबळेश्वर येथून सन २०२३-२४ पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यातील मध उद्योगाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी व मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी राज्यातील मध उद्योगात कार्य करणाऱ्या मधपाळ, प्रगतीशील मधपाळ, ब्रान्ड धारक मधपाळ शेतकरी सातेरी, मेलीफेरा, आग्या मधमाशापालन संकलन या कार्यात कार्यरत असणाऱ्या घटकांची निवड करुन मधमाशी मित्र पुरस्कार दि. 20 मे 2023 रोजी प्रदान केले जाणार आहेत.

याबाबतची अधिक माहिती व विहित नमुन्यात भरून दयावयाचा अर्जाचा नमुना मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी तो उपलब्ध करून घ्यावा. त्यामधील सर्व माहिती व फॉर्म भरून मंडळाच्या जिल्हा कार्यालयात दि. 8 मे 2023 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत—

1) अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. 2) मध उद्योग प्रशिक्षण घेऊन किमान 10 वर्षे मध उद्योगाचे कार्य केलेले असावे. 3) सर्वात जास्त मधोत्पादन व वसाहती असल्यास प्राधान्य, 4) मध उद्योगात विस्तार, प्रशिक्षण, प्रजननाद्वारे वसाहत संख्या वाढविणे, संशोधन, मधोत्पादन, मेण उत्पादन, साहित्य निर्मिती, प्रयोग, मध प्रक्रिया व उप उत्पादनांचे संकलन (रॉयल जेली,पराग, विष, प्रोपोलिस ) काम केलेले असावे. 5) स्वतःचा ब्रँड विकसित केलेला असल्यास प्राधान्य, 6) वसाहत विकसित करून विक्री करणाऱ्यास प्राधान्य, 7) प्रचार-प्रसिद्धी अंतर्गत शासनाच्या उपक्रमात सहभाग असावा, 8) मंडळाकडे मध पुरवठा करणाऱ्यास प्राधान्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!