दक्षिण रायगड युवक जिल्हाअध्यक्ष ( भाजपा ) युवानेते निलेश थोरे यांच्या वतीने आरती संग्रह पुस्तीकेचे प्रकाशन
धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभहस्ते दक्षिण रायगड मधील गणेशभक्तांसाठी आरती संग्रहाचे अनावरण
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
रायगड : दी 16 सप्टेंबर रोजी दक्षिण रायगड युवक जिल्हाअध्यक्ष ( भाजपा ) युवानेते निलेश थोरे वतीने आरती संग्रह पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले आहे आणि भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मा. आ. धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभहस्ते दक्षिण रायगड मधील गणेशभक्तांसाठी आरती संग्रहाचे अनावरण करण्यात आले.
जिल्ह्यातील गावोगावी भाविकांना सदरील आरती संग्रह मोफत उपलब्ध करून देण्याकरीता भाजपा व युवा मोर्चा चे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत.
यावेळी पेण विधानसभा संयोजक प्रसाददादा भोईर, पाली उपनगराध्यक्ष अरिफजी मणियार, सोपानजी जांभेकर, सुशिलजी शर्मा, सोशल मीडिया संयोजक प्रियांका पिंपळे, उ. भा. सेल उपाध्यक्ष दुबेजी, वैशाली शेडगे, मुग्धा गडकरी, लाड, मकरंद गडकरी, परेश सांगले, मंदार मढवी व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



