तालुका

लादुलाल जैन यांचेकडून काळीज शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड मधील सामाजिक सेवक दानशूर व्यक्तीमत्व व महावीर एम्पोरियमचे मालक लादुलाल जैन यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या काळीज शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

महाड मधील समाज सेवक लादुलाल जैन हे दरवर्षी तालुक्यातील शाळां मधून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपकरीत असतात. प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून ते त्यांच्यावर संस्कार, कथेच्या माध्यमातून मार्ग दर्शन करीतअसतात व्यसना पासून अलिप्त राहण्याचा संदेश ते प्रत्येक वेळी देत असतात. काळीज येथील राजिपच्या शाळेतील आदिवासी, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, पेन, पॅड, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप लादुलाल जैन यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका  हजारे यांनी लादुलाल जैन व त्यांचे समवेत आलेले  मेहता यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!