तालुका

अनिकेत समर्थ ग्रुप चा स्तुत्य उपक्रम

सचिन चांदोरकर - उपशहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 26 अनिकेत समर्थ ग्रुप महाड तर्फे पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या पुण्यतिथी दिनाचं औचित्य साधून नगरपालिकेच्या शाळेतील 58 विद्यार्थीनी शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेऊन दत्तक योजनेची परंपरा सुरूच ठेवली आहे.

      महाड नगरपालिकेच्या शाळा क्र. 2 मधील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अनिकेत समर्थ ग्रुप दरवर्षी दत्तक घेत असतात, यंदाही यादत्तक योजनेत या शाळेतील 58 विद्यार्थीनी दत्तक घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आज शाळेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अनिकेत समर्थ ग्रूप वतीने दत्तक पालक योजनेसाठीच्या आवश्यक रकमेचा धनादेश शाळेच्या मुख्याध्यापिका हाटे मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला.

       यावेळी अनिकेत समर्थ ग्रुप चे आधारस्तंभ वैभव  भोसले, अध्यक्ष आशिष चिखले, निनाद कापडेकर, आदेश चव्हाण, राहुल कदम, आदिल सय्यद, अजित अवसरे, ऋषी नंद्विकर, यश कोकणे, श्रेयस मनवे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!