तालुका

पोलादपूर तालुक्यातील सर्वांगीण विकासकामांचे भूमि पूजन व उद्घाटन सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न

भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न

 

अभिजीत ढाणीपकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

पोलादपूर तालुक्यातील लोहारे, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा, वझरवाडी, देविल पार्ले या गावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न झाला.

लोहारे पवारवाडी साकव, तुर्भे वजरवाडी ते मोहिते वाडी रस्ता, तुर्भे देऊळवाडी रस्ता भूमिपूजन, वजरवाडी नळ पाणीपुरवठा योजना याकामांचे भूमिपूजन तसेच वजरवाडी कमानी प्रवेशद्वार, वझरवाडी ग्रामपंचायत कार्यालय आणि वझरवाडी साकव अश्या विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!