राजकिय

फौजी अंबावडे येथील काँग्रेस कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

अभिजीत ढाणीपकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड

महाड तालुक्यातील फौजी आंबवडे चिंचेची वाडी या गावातील महिलांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आमदार भरतशेठ गोगावले वपदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

काँग्रेस पक्षात राहून विकास कामे होत नसल्यामुळे शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहोत असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

या वेळी गजानन पवार, तुकाराम पवार, धोंडीराम पवार, शेवंता पवार, सुशीला पवार, जयश्री पवार, मुक्ता पवार, अश्विनी पवार, पार्वती पवार, कलावती पवार, अंजना पवार, सुशीला पवार, चंद्रकांत पवार, विशाल पवार, ज्ञानेश्वर पवार, कार्यकर्ते व महिला ग्रामस्थ यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

या प्रवेश समारंभावेळी विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय आप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, बंडू तरडे, महाड महिला तालुका संघटक प्रतिभा पवार, विन्हेरे विभाग प्रमुख प्रभाकर पवार, माजी सरपंच सखाराम पवार, शाखाप्रमुख काशिनाथ पवार, युवासेना विभाग प्रमुख सुजित पवार, या विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!