जिल्हा

सावित्री काळ नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडणार नाही – आमदार भरतशेठ गोगावले

पार पडलेल्या मंत्रालयातील बैठकीत राज्याचे पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांचे प्रतिपादन

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड : सावित्री गांधारी काळ नदीपात्रातील चालू वर्षात गाळ काढण्यासंदर्भात पुर निवारण समितीच्या मागणीचा पाठपुरावा करत आमदार भारतशेठ गोगावले यांनी राज्याचे पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत मंत्रालयामध्ये जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या उपस्थितीत ३१ कोटी निधी संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकारी राजभोग मॅडम, महाडच्या प्रांत पुदलवाड मॅडम, तहसीलदार काशीद संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लवकरात लवकर गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करावा स्थानिक कमिटया आणि जागरूक नागरिक या संदर्भात वारंवार मागणी करत आहेत, असे गोगावले यांनी या बैठकीदरम्यान प्रश्न उपस्थित केला, या मागणीचे उत्तर देताना आसिम गुप्ता यांनी सांगितले की, लवकरच यावर्षी गाळ काढण्यास सुरुवात होईल, तसेच गेल्या वर्षी विलंब झाला कारण काही शासकीय त्रुटी होत्या, यावर्षी बहुतेक अडचणी दूर झालेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, तसेच लवकरात लवकर 25 तारखेपर्यंत निधीची तरतूद करून कामाला सुरुवात होईल, असे गुप्ता यांनी सदर बैठकीत सांगितले.

स्थानिक आमदार गोगावले यांनी दोन दिवसापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी पत्रकारांच्या आणि पूर्ण निवारण समितीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते, दोन दिवसात मी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यां समवेत बैठक घेण्याची मागणी करणार आहे, आणि गोगावले यांच्या गणिती वरिष्ठांनी दखल घेत तातडीने बैठक घेतली, आणि सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा तसेच गोगावले यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!