संदीप सकपाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश
आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड दि. 27 कुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप सकपाळ नायक मराठा समाज अध्यक्ष नागाव गट यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाड विधानसभा मतदारसंघ महाड तालुका विन्हेरे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला नवीन वसाहत येथे घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वेळी प्रवेश कर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, एवढ्या वर्ष या पक्षात राहून आमच्या भागाचा विकास फक्त शिवसेनेच्या आणि कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्याच माध्यमातून झाला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नाही त्यामुळेच आम्ही गोगावले साहेबांच्या नेतृत्वा खाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहोत, तसेच आम्ही एका समाजाचे असल्यामुळे कधीही आमदार साहेबांनी दुजा भाव दाखवला नाही. तुम्ही दुसऱ्या पक्षात आहात आम्ही तुमची कामे कसे करायचे असे कधीही गोगावले यांनी बोलून दाखवले नाही गोर गरीब जनतेला वेळ प्रसंगी अहोरात्र मदत करत सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या या त्यांच्या विचारसरणीला भुरळून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.
या वेळी प्रवेश कर्त्यांचे आमदार भरत गोगावले यांनी भगवे पताका घालुन मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात स्वागत केले.
प्रवेश कर्ते– संदीप भाऊ बाबाजी सकपाळ नायक मराठा समाज अध्यक्ष नागाव गट, प्रदीप सकपाळ, जयदीप सकपाळ, संदीप सकपाळ, गणपत सकपाळ, शेवंती सकपाळ, चंद्रकांत सपकाळ, सुनिता सकपाळ, रानवडे सखाराम मालुसरे, शांताराम मालुसरे, हरिचंद्र मालुसरे, रामदास कदम, सुमती आंग्रे, भूषण सपकाळ, महेश मोरे, राजेश पवार, रमेश मालुसरे, नथुराम मालुसरे, इत्यादींनी राष्ट्रवादी मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित मा जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, विभाग प्रमुख अनंत बुवा सावत जालिंदर मोरे, मंगेश गायकर, दत्ता गायकर, युवा सेनेचे पप्या अंबावले ,संदीप खिडबीडे, सचिन कासारे, प्रवीण सळवि, वामने सरपंच, नामदेव रेशीम, इत्यादी विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी शिवसैनिक इत्यादी उपस्थित होते.
यावेळी कुर्ला येथील विजय गायकर यांचे घर पावसामध्ये कोसळले होते त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदत आमदार भरत गोगावले यांच्या वतीने या पक्षप्रवेश समारंभावेळी तात्काळ करण्यात आली.



