तरुणांनी आपला वाढदिवस समाजिक उपक्रम राबवून साजरा करावा – सिद्धी शिंदे, महाड शहर शिवसेना युवती अध्यक्ष
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड : सामाजिक कार्याची आवड असेल तर सवड काढता येते असे म्हणत 90 टक्के समाजकारण व केवळ दहा टक्के राजकारणनुसार काम करणारी सिद्धी शिंदे हिने आपला वाढदिवस समाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.
आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एक छोटासा उपक्रम म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रथमिक विद्यालय महाडनगर पालिका शाळा क्र. ५ या शाळेला रोप आणि कुंड्या भेट म्हणून दिल्या तसेच लवकरच शाळे मधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू चे वाटप करणार आहोत असे यावेळी नमूद केले. सिद्धी नेहमी च आपल्या समाजिक कार्य साठी ओळखली जाते. या आधी देखील त्यांनी जखमी गाई वर उपचार, अनेक नाग, अजगर अशा प्राण्यांना जीवनदान, शालेय वस्तू वाटप तसेच कोरोना आणि महापुराच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे असे अनेक समाजिक उपक्रम राबविले आहेत.
इतर तरुणांनी देखील आपला वाढदिवस समाजिक उपक्रम राबवून साजरा केला तर गरीब विद्यार्थाना थोडी फार मदत होईल असे यावेळी सिद्धी शिंदे यांनी आपले विचार मांडले.



