महाडच्या संत रोहिदास तरुण विकास मंडळाची उत्तुंग भरारी
महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत रायगड जिल्हयात प्रथम क्रमाकांने सन्मानित
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड मधील रोहिदास तरुण विकास मंडळ ४८ वर्षे सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून आपल्या कार्याने संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण कोकणात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. रोहिदास सार्वजनिक गणेशोत्सवा मध्ये गेली २५ वर्ष सातत्याने प्रथम क्रमांकाची परंपरा कायम राबवताना लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सामाजिक बांधिलकी जपत समाज प्रबोधन करण्याचा वसा घेतलेले हे महल नाविण्यपूर्ण देखावा सादर करण्यात कायम अग्रेसर ठरलेले आहेत. या मंडळाचे वैशिष्ट्ये म्हणजे पर्यावरण पूरक गणेशमूर्तीची परंपरा राखत असताना सर्व देखावा स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करित वैशिष्ट्ये पूर्ण कामाचा ठसा उमटविलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासपूर्ण भित्तीचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्वलत विषयाला हात घालून त्यांची सोप्या पद्धतीने मांडणी करुन तो विषय अबाळ वृध्दांना समजेल असा सादर केला जातो. म्हणून प्रतीवर्षी सुमारे ३५ हजार गणेश मंडळे या मंडळाला भेट देतात.

झी २४ तास च्या राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत तालुकास्तर, जिल्हास्तरीय व विभागीयस्त (कोकण विभाग) प्रथम क्रमांकाचे ३ लाखांचे बक्षिस मिळविलेले हे एकमेव मंडळ असून या वर्षीहि हि परंपरा कायम राखत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत राज्यस्तरिय बक्षिसांमध्ये रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
समाज प्रबोधनाच्या आयोजनासह गणेशोत्सवाच्या काळामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप. दत्तक पालक योजना पारंपारिक देशी खेळाच्या स्पर्धा, पारंपारिक लोकनृत्य, महिलांकरिता आरोग्य शिबीर तसेच समाज प्रबोधनात्मक भजन कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. हा गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मंडळाचे पदाधिकारी तसेच मंडळाचे अध्यक्ष मयुर चांदोरकर, उपाध्यक्ष : प्रविण चांदोरकर, सेकेटरी अशिष महाडीक, सहसेक्रेटरी निशांत महाडीक, मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे विशेष सहकार्य नरेंद्र महाडीक, सुधीर शेठ, शिवाजी महाडीक, संजय कापडेकर, लाईट ऑपरेटकर प्रविण महाडीक, संजोग म्हशिलकर, रोहिदास महिला मंडळाचे अध्यक्ष शितल बिरवाडकर, उपाध्यक्ष जयश्री दुर्गेश गोरेगांवकर, सेक्रेटरी तेजश्री कांबळे, सहसेक्रेटरी कविता महाडीक तसेच महिला मंडळाचे सहकार्य लाभले. मंडळाच्या वतीने सर्व रहिवासी, वर्गणीदार, हितचिंतक तसेच महाडकर नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.



