तालुका

माणगाव शहरात शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन – आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते

माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

 

योगेश कडू – शहर प्रतिनिधी महाड 

माणगाव: माणगावमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

माणगाव शहर, ग्रामीण आणि निजामपूर भागामधून येणाऱ्या सर्व जनतेकरीता एक हक्काचे कार्यालय माणगाव शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणाहून सर्वसाधारण जनतेची तसेच शिवसेनिकांचे कामे होण्याकरीता अत्यंत महत्त्वाचे कार्यालय ठरणार आहे.

या कार्यक्रम दरम्यान असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यामध्ये माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश केला.

यावेळी संपर्कप्रमुख अरुण चाळके, तालुका प्रमुख महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष तसेच मा. रा. जि. प सदस्य राजू साबळे, माणगाव शहरातील शहर प्रमुख नगरसेवक, शिवसेना युवा सेनेचे आजी – माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!