साळाव – मुरुड- आगरदांडा रस्त्याची दुरावस्था
रस्ता चांगल्या दर्जाचा न झाल्यास रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा - अरविंद गायकर
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी या रस्त्याकरिता दिला निधी मात्र संबंधित ठेकदाराने उच्य दर्जाचे काम करावे ही मुरुड वाशियांची मागणी
शरद चाफेकर – शहर प्रतिनिधी मुरुड जंजिरा
मुरुड जंजिरा : मुरुड शहरासह तालुका पर्यटन क्षेत्र असून या रस्त्यावरून रोज शेकडो पर्यटक ये – जा करत असतात. मात्र रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे ते त्या मार्गांवरून प्रवास केल्याशिवाय अनुभवता येणार नाही, रस्ता अवस्था बिकट असल्याकारणामुळे नेहमी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याने टपरीधारक, हॉटेल, लॉजिंग आणि रेस्टॉरंट यांना आर्थिक फटका बसून यापैकी काही जण कर्जबाजारी देखील झाले आहेत. याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी केला आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अपघातांचेही प्रमाण देखील वाढले आहे. खड्यामुळे प्रवास नकोसा झाला आहे, तसेच अलिबागहून शहरात येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरही मुरुड मध्ये येण्यास या खड्यामुळे पाठ फिरवळ्यांनी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आता रुग्णांनाच खड्ड्यातून अलिबागचा प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यासाठी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी निधी उपलब्ध करून दिला असून, संबंधित ठेकदाराने उत्तम दर्जाचे काम करावे, रस्ता चांगल्या दर्जाचा न झाल्यास या रस्त्यावरच उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर सांगितले आहे.



