तालुका
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कमिटी सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच उबाठा कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड विधानसभा मतदारसंघातील देशमुख कांबळे येथील श्रीमंत ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश कमिटी मेंबर संतोष देशमख तसेच देशमुख कांबळे ग्रामपंचायत सदस्य लीना सचिन देशमुख यांच्या समवेत उबाठा गटातील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
महाड तालुक्यातील आणि बिरवाडी भागातील शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभाग प्रमुख, संपर्क प्रमुख आणि पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.



