जिल्हा

जिल्ह्यात दि. 01 ते दि.15 ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड

रायगड दि. 02 ऑगस्ट पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात दि. 01 ऑगस्ट ते दि. 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत “पशुसंवर्धन पंधरवडा-2024 आयोजित येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ. शामराव कदम यांनी दिली आहे.

दि.01 ऑगस्ट ते दि.15 ऑगस्ट 2024 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्याकीय संस्थामार्फत पशुधनाचा साथ रोग प्रादूर्भावापासून बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात,लम्पीचर्मरोग ,घटसर्प फऱ्या पीपीआर, आंत्रविषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधींचे वाटप, गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गाई म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्व तसेच माहे सप्टेंबर 2024 पासून चालू होणाऱ्या 21 व्या पशुगणनेच्या अनुषंगाने माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा.

राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात सदर पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून “उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!