ॲड. सनी जाधव यांची भारत सरकारच्या नोटरी म्हणून शासनाकडून नियुक्ती
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड: दि. 19 मार्च महाड तालुक्यातील नामांकित ॲड. सनी जाधव यांची भारत सरकारच्या नोटरी म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
कायदेशीर दस्तऐवजावर स्वक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फारं महत्वाचे आहे, व्यवहार योग्य रीतीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात. भारत सरकार यांच्या वतीने ॲड. सनी जाधव यांच्या कामाची दखल घेत दि. १४ मार्च 2024 रोजी त्यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीचे महाड तालुक्यात स्वागत केले जात आहे, ॲड. सनी जाधव महाड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गेली १७ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असून ते समाजिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील अग्रेसर असतात तसेंच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे विश्वासू निकटवर्तीय असून दक्षिण रायगड शिवसेना लिगल सेल च्या जिल्हाप्रमुख पदी कार्यरत आहेत.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल आमदार भरतशेठ गोगावले यांनी ॲड. सनी जाधव यांचे कौतुक केले.
या वेळी अनुशक्ती नगर मुंबई विधानसभेचे मा. आमदार तुकाराम काते, शिवसेना पधादिकारी, नायक मराठा समाजाचे मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



