आरोग्य व शिक्षण

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंण येथे आज आतंरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंण येथे आतंरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून योग प्रात्यक्षिकात मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

तसेच याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की सकाळपासूनच ठिकठिकाणी योग कार्यक्रम सुरू आहेत. योगाभ्यास चांगला झाल्याने काम चांगले होईल. योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ९ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला सुरुवात करून योग संपूर्ण जगभरात पोहोचवला सांगितले. तेव्हापासून जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे न्यूयार्कमध्ये योग करीत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे असे या प्रसंगी त्यांनी सांगितले.

शासन, प्रशासन यांना तणावमुक्त राहण्यासाठी योग ही काळाची गरज आहे. रोज योग करूया आणि निरोगी राहूया असा मूलमंत्र यावेळी उपस्थितांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तसेच “जागतिक योग दिनाच्या” सर्वांना शुभेच्छा ही दिल्या.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच प्रशासकीय अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!