बेंबळे येथे योगादिना निमित्त योग व प्राणायाम शिबीर संपन्न
अनिल अवताडे – तालुका प्रतिनिधी माढा
बुधवार दि. २१ जुन रोजी पहाटे ५:३० वाजता प्राथमिक शाळा बेंबळे येथे बेंबळे गावचे सरपंच, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी योगादिनानिमित्त योग व प्राणायम करुन गावकर्यांना प्रेरणा देण्याचे कार्य केले.
व्यसनमुक्ती संघटनेचे समाधान सलगर यांनी आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्व व फायदे सांगून दररोज अशा योग व प्राणायामाची गरज असल्याचे सांगितले. सरपंच विजय पवार यांनी योगादिनाचे औचित्य साधून उद्या पासून दररोज पहाटे साडेचार वाजता अशा प्रकारचे योग/प्राणायम करण्याचा संकल्प केला आणि गावातील तरुणांसह वयस्क मंडळींनीही जास्तीत जास्त प्रमाणात यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच विजय पवार यांचेसह संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, सप्तेश्वर अँग्रोचे जयवंत भोसले, भारत पेट्रोलियमचे विश्वजीत भोसले, व्यसनमुक्तीचे समाधान सलगर, मोहसिन मेडीकलचे मालक पैगंबर तांबोळी, मुख्याध्यापक समाधान अवताडे, समाधान शिंदे यांच्यासह गावातील अनेक मुलं-मुली यामध्ये सहभागी झाले होते.



