जिल्हा
श्रीवर्धन मध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न
तहसील कार्यालय प्रांगणात तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
न्यायालयाच्या प्रांगणात न्यायाधीश सोनाली जवळगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन: न्यायालयाच्या प्रांगणात न्यायाधीश सोनाली जवळगेकर, तहसील कार्यालय प्रांगणात तहसीलदार महेंद्र वाकलेकर आणि नगरपरिषद प्रांगणात मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.
यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी नायब तहसीलदार रत्नदीप केमनाईक, निवासी नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालीन कर्मचारीवृंद, र.ना. राऊत महाविद्यालय विध्यार्थी वर्ग, पदाधिकारी, सदस्य, श्रीवर्धन शहरातील तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




