शेल भोगावं येथील संपूर्ण आदीवासी वाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : शेल भोगावं येथील संपूर्ण आदीवासी वाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला, गेली 25 वर्ष शिवसेनेत राहून आम्ही मात्र विकासापासून वंचित राहिलो, आम्हांला पिण्याचे पाणी सुद्धा विकत घ्यावे लागते अशी प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या भोगावं येथील संपूर्ण आदीवासीवाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे महाड विधानसभा नेते नानासाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश होण्यासाठी शशी भाई देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, तालुका संघटक राजुशेठ कोरपे, खरवली सरपंच बाबुदादा म्हामुणकर, धनंजय देशमुख, शशिभाई देशमुख, किशोरभाई देशमुख, सुधीर शिंदे व मान्यवर उपस्थित होते.



