पाच दिवसांच्या गौरी गणपतींचा ढोल-ताशांच्या गजरात निरोप
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी घरगुती तसेच पाच दिवस आणि गौरी गणपतींना निरोप दिला गेला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. पाच दिवसांचा पाहुणाच घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पा निघाले असून अनेक ठिकाणी विसर्जन झाल्याचे पहिले. यासाठी प्रशासनाकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली गेली होती.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ही रोहिदास नगर महाड मधील विजय लक्ष्मण चांदोरकर यांचा पारंपारिक पद्धतीने घरी गौरी व गणपतीचे आगमन झाले होते, आगमनापासून ते विसर्जन पर्यंत चांदोरकर परिवाराने एकत्र येऊन अगदी आनंदात उत्सव साजरा केला.

कोकणात अगदी पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदृगांच्या सुरात बाप्पाचं विर्सजन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीभावने आणि जड अंत: करणाने निरोप दिला गेला.



