माणगाव तालुक्यात शिंदे गटाला खिंडार
करीश्मा मांजरे, शाखाप्रमुख प्रसाद मांजरे ह्यांच्यासह पहेल ग्रामस्थांचा शेकडोंच्या संख्येने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात जाहीर प्रवेश
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
माणगाव : माणगाव तालुक्यातील लोणेरे – गोरेगाव विभागातील पहेल गावातील सरपंच पदाच्या उमेदवार करीश्मा प्रसाद मांजरे, शाखाप्रमुख प्रसाद मांजरे ह्यांच्यासह पहेल ग्रामस्थांचा, युवकांचा आणि महीलांचा शेकडोंच्या संख्येने शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात जाहीर केला.

या वेळी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, विधानसभा संघटक संजय घोसाळकर, विधानसभा समन्वयक सिताराम मेस्त्री, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवासेना जिल्हा अधिकारी बंटी पोटफोडे, पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख सतिश शेलार, कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत धोंडगे, विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, राजा बिरवाडकर, युवासेना लोणेरे विभाग प्रमुख मोनिश टेबे, मोर्बा विभाग प्रमुख सिकंदर आंबोणकर, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, गोरेगाव उपविभाग युवासेना अधिकारी अक्षय कदम, पन्हळघर नवनिर्वाचित सरपंच हरिदास शेडगे तसेच विभागातील तमाम श्रेष्ठ शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.



