तालुका
वहूर सुतार आळीतील शेकडो ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मुख उपस्थितीत पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड तालुक्यातील वहूर येथील मावळतीवाडी आणि उगवतीवाडी पाठोपाठ सुतार आळीमधील असंख्य ग्रामस्थ महिला भगिनींनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
महाड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाड – पोलादपूर – माणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले हे वेळोवेळी शासन दरबारी करत असलेल्या पाठपुराव्यामुळे महाड विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होत आहे आणि विकासकामांच्या दररोज अनेक गावे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत.
या वेळी महाड तालुक्यातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



