ब्रेकिंग

कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वराचा मृत्यू

आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीचा अपघात

 

शरद चाफेकर – शहर प्रतिनिधी मुरुड – जंजिरा 

मुरुड – जंजिरा : 02 मार्च 2024 रोजी मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर मोटारसायकल आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली आणि अपघातामध्ये दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड – अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी हे मुरुड – नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी येत होते, यावेळी जासीम अब्दुल रहेमान पासवारे हा आपली हिरोहोंडा मोटारसायकल वरून माणगावच्या दिशेने जात होता, त्याचवेळी आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोलनाक्यावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

या अपघातामध्ये दुचाकीस्वर जबर जखमी झाल्याने त्याला मुरुड – जंजिरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, दुचाकीस्वराला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कारचालका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!