31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अहोरात्र प्रयत्न
राज जाधव – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची रायगड जिल्ह्यात अलिबागसह इतर तालुक्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू झाली आहे. मात्र ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादूर्भावास रोखणे, हेदेखील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवर अहोरात्र अथक प्रयत्न सुरू आहेत.
प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांच्या स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक, पर्यटन क्षेत्राशी संबंधित इतर घटक यांच्या बैठका घेण्यात येत असून सर्वांना कोविड अनुरूप वर्तनाविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. नागरिकांना विविध माध्यमांमधून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण करून घेणे याविषयी सातत्याने आवाहनकेले जात आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांची थर्मल स्कॅनरने तपासणी, त्यांनी लसीकरण केले आहे किंवा कसे, याबाबतची विविध तपासणी नाक्यांवर चौकशी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कोविड प्रतिबंधक उपाययोजनां विषयीचे सूचना फलक लावण्यात आलेआहेत. आरोग्य विभागाच्या, नगरपालिकेच्या फिरत्या वाहनांवरील लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे, कोविड प्रतिबंधकनियमांचे पालन करण्याविषयी आवाहन केले जात आहे. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी–कर्मचारी जिमखाना, क्लब, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, दुकाने, धार्मिक स्थळे, कोचिंग क्लासेस, खाजगी कार्यालये, सार्वजनिक स्थळे इत्यादी ठिकाणी भेटदेत असून ज्या ठिकाणी नागरिक विनामास्क आढळत आहेत त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांनी नववर्षाचे स्वागत उत्साहाने जरूर करावे, मात्र सर्वांनी स्वत:च्या वकुटुंबाच्या काळजीसाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण करून घेणे या कोविडप्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालनही करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.



