तालुका
श्री. देव कांगोरमाळ देवस्थान खरवली – कातीवडे मंदिर जीर्णोद्धार व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : श्री देव कांगोरमाळ देवस्थान खरवली – कातीवडे मंदिर जीर्णोद्धार व मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना रायगड जिल्हा युवा नेते शिवसेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते मंदिराचा फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या वेळी मा. जिल्हा परिषद सदस्य सुषमा ताई गोगावले, मनोज काळीजकर, मा. पंचायत समिती सदस्य सपना ताई मालुसरे, नायक मराठा समाज अध्यक्ष सुभाष निकम, खरवली कातीवडे येथील ग्रामस्थ, महिला, या भागातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

या पंचक्रोशीत उभारलेल्या सुंदर अशा या मंदिराच्या देखण्या वास्तूचे लोकार्पण करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे श्री देव कांगोर माळ खरवली कातीवडे चारी टेबल ट्रस्ट च्यावतीने स्वागत करण्यात आले.



