वरंध येथे पावणेतीन कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : महाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून गणल्या गेलेल्या वरंध ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुमारे पावणेतीन कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आलेल्या कामाचा ४ मार्च रोजी शिवसेना उपनेते पक्षप्रतोद कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला.

वरंधकरांना मागील निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आम्ही पूर्ण करत आहोत याची आठवण यावेळी करून देताना तुम्ही आम्हाला मतदान केले किंवा नाही केले तरी देखील आम्ही तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करत आहोत या ग्रामपंचायती मध्ये नुकतीच विरोधी पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत तरीदेखील आम्ही राजकारण न करता समाज हितासाठी या ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ महिला भगिनी ही माणसे आपली आहेत ही भावना ठेवत आम्ही शब्द दिला होता याची आम्ही जाणीव ठेवली आहे, एवढे तुम्ही लक्षात ठेवले तरी पुरे असे यावेळी आपल्या मार्गदर्शनात गोगावले यांनी वरंधकरांना सुनावले, तसेच आम्ही फक्त नळ पाणीपुरवठा योजना या गावाला पूर्ण करून थांबणार नाही तर या ग्रामपंचायत हद्दीत जी काही विकास कामे राहिली आहे ती उर्वरित कामे देखील आम्ही पूर्ण करू असा वरंधकरांना आत्मविश्वास या ठिकाणी देत तुमची विकास कामे करण्यासाठी बाहेरून कोणीही येणार नाही, तुमच्या अडीअडचणींना मदतीसाठी धावून फक्त आम्ही स्टेजवरील सर्व शिवसेनेची मंडळीच आपल्या कामी येणार आहोत एवढे लक्षात ठेवा बाकी येतील भूलथापा मारून निघून जातील पण कायमस्वरूपी आम्हीच तुम्हाला सहकार्य करणार असे यावेळी गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, पंचायत समिती सदस्य सपना ताई मालुसरे, उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले गोपीनाथ सावंत, उपविभाग प्रमुख राजेश देशमुख, संपर्कप्रमुख एकनाथ सुकूम, वरंध भागातील शिवसेना, युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होत.



