तालुका
शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाला यश
सावित्री नदी पात्रातील गाळ उपसण्यासाठी शासनाकडून निधी वर्ग
स्वप्नील ढवण – उपसंपादक
महाड तालुक्यातील सावित्री नदी पात्रातील व आजूबाजूच्या परिसरातील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली असून निधी अभावी यंत्र सामुग्रीला लागणाऱ्या इंधनाचा तुटवडा भासत होता, मंत्रालयात वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रधान सचिव मदतव पुनर्वसन अधिकारी असीम गुप्ता, विशेष कार्यकारी अधिकारी जलसंपदा विभाग विजय गौतम यांच्याकडे सतत पाठपुरावा करून याकामासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या पाठ पुराव्यामुळेच सदर निधी वर्ग करण्यात आला आहे, मागील आठवड्यात अधिवेशन सुरू झाल्यापासून रोज संबंधित मंत्री आणि शासकीय विभागाकडे पाठपुरावा करत होते, सदर निधी वर्ग केल्यामुळे आता या कामाला आणखी गती मिळणार असून मोठ्या प्रमाणात नदीतील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात होणार आहे.



