तालुका

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

अभिजीत ढाणीपकर - शहर प्रतिनिधी महाड

 

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महाड शहर आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य महिलांनी विविध आरोग्य तपासणी करून घेतल्या,

दिवस रात्र घर संसारासाठी राबणाऱ्या महिला भगिनी या आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करतात, काही आजार अंगावर काढतात, मात्र हे आजार हाताबाहेर जाऊ नयेत म्हणून सदर शिबिराचे शिवसेनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात झालेल्या निधनानंतर पुढील उपचारासाठी आपण कटिबद्ध आहोत, या आरोग्य शिबिरासाठी महाड शहरातील शिवसेनेच्यामहिला भगिनींनी विशेष मेहनत घेतली त्यांनी केलेल्या परिश्रमा मुळेच सदर आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील आणि शहरातील महिला पदाधिकारी शिवसेना युवा सेनेचे आजी–माजी पदाधिकारी शहर प्रमुख नगरसेवक इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!