जिल्हा

साद सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित ऐतिहासिक मढेघाट बारव फलक अनावरण मोहीम संपन्न


सचिन
चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

मढेघाट म्हणजे शिवकालीन राजमार्ग शिवकाळात मावळे तसेच व्यापारी याच मार्गाने ये– जा करत असत, ह्याच मार्गाने नरवीर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव सिंहगडावरून त्यांच्या कोकणातील उमरठ या गावी आणण्यात आले. ह्याच तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारी मढेघाट पायथ्याशी असणारी शिवकालीन बारव येथे १८ सप्टेंबर २०२२ या दिवशी सूचना माहिती फलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले, जेणेकरून या ठिकाणचे पावित्र्य राखले जाईल आणि येणाऱ्या पर्यटकांना, शिवप्रेमींना ऐतिहासिक बारवच्या इतिहासबद्दल माहिती मिळेल, ह्या फलकांचे अनावरण सागर जाधव आणि प्रशांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


ह्या कार्यक्रम प्रसंगी साद सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रतीक मोरे, प्रशांत जाधव, रोहित मालुसरे, कल्पेश सागवेकर, प्रतीक राजेमहद्दीक, रोहन मोरे, मनोज गुलंबे, सागर शेलार, प्रदिप बोरणे आणि इतर सदस्य तसेच श्री संभाजी महाराज राज्याभिषेक समितीचे सदस्य सिद्धेश सुर्वे, अक्षय दळवी आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थानचे जयेश शिंदे, आदेश उत्तेकर तसेच तेजस म्हामूनकर, पंकज मोरे, जय जवान अकॅडमीचे लुष्टे सर आणि रानवडी वाकी परिसरातील तरुण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!