तालुका
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून विकासशेठ गोगावले यांसकडून महागाव आदिवासीवाडी 54 आदिवासी मुला – मुलींना वह्याचे वाटप
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
तळा : सोमवार 17 जुलै रोजी तळा तालुक्यातील महागाव आदिवासी वाडी येथील रा. जि. प. शाळा महागाव येथील 54 आदिवासी मुला – मुलींना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य – युवा नेते विकासशेठ गोगावले यांसकडून वह्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी तळा तालुक्यातील युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते रा. जि. प. शाळा महागाव येथील शिक्षक वर्ग आणि पालक उपस्थित होते.



