जिल्हा

रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी मनिषा पिंगळे रुजू

 

बंटी पाटील – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड 

जिल्हा माहिती कार्यालय, रायगड – अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी श्रीमती मनिषा पिंगळे रुजू झाल्या आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी 17 जुलै 2023 रोजी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मनोज शिवाजी सानप यांचे कडून स्वीकारला. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधी व मान्यवरांनी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांचे स्वागत केले तसेच ठाणे जिल्हा माहिती अधिकारी पदावर बदली झालेले सानप यांना निरोप दिला.

याप्रसंगी व्हीएसटीएफचे रत्नशेखर गजभिये, जिल्हा शासकीय रक्तपेढीचे हेमकांत सोनार, प्रसारमाध्यमा मधील ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, लोकसत्ताचे हर्षद कशाळकर, लोकमतचे जमीर काझी व राजेश भोस्तेकर, आपलं महानगरचे अमूलकुमार जैन यांसह सुधीर आग्रावकर, श्रीमती शारदा धुळप, समुपदेशक अक्षय गोरे तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हा माहिती कार्यालयातील नूतन माहिती अधिकारी किरण वाघ आणि कर्मचारी विठ्ठल बेंदुगडे, श्रीमती निशा कदम, जयंत ठाकूर, प्रफुल्ल पाटील हे उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांनी यापूर्वी मंत्रालयात तत्कालीन गृहमंत्री यांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात प्रकाशने शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून व विभागीय संपर्क अधिकारी पदावर काम केले आहे. या बरोबर पालघर जिल्ह्याच्या प्रथम जिल्हा माहिती अधिकारी व ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रमांसाठी काम करताना त्यांनी योगदान दिले आहे.

तसेच किरण रा. वाघ यांची जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी देखील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!