संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
प्रतीक्षा गायकवाड आणि डॉ. जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती संपन्न
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : संत रोहिदास नगर महाड येथे दी. २७ जानेवारी ते ०५ फेब्रुवारी या कालावधी मध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली.
संपूर्ण कार्यक्रम सामजिक बांधिलकीच्या जाणिवेतून महोत्सव यशस्वी करण्यात आला, कार्यक्रमाची सांगता ही ०५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सकाळी १०.०० वाजता महापूजा करून नंतर संत रोहिदास चौक फलक ( वेलनेस मेडिकल ते परिवार शो रूम ) येथे पुष्प अर्पण करून मग समाजातील समजाबंधव तसेच त्यांच्या सोबत लहान मुले, मुली असे एकूण २६ जणांनी चांभार गड पदभ्रमण केले, या वेळी फनिगेम्स असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून, सायंकाळी ७.०० वाजता प्रमुख पाहुणे वेट लिफ्टिंग चॅम्पियन प्रतीक्षा गायकवाड आणि डॉ. जोगळेकर यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना पुष्पहार व दीपप्रज्वलन करून बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम याचे देखील आयोजन देखील करण्यात आले होते.

संपूर्ण मोहत्सव यशस्वी करण्याकरिता मंडळाचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ यांनी खुप मेहनत घेतली.

या वेळी रोहिदास तरुण विकास मंडळ महाड अध्यक्ष मयूर धनराज चांदोरकर, उपाध्यक्ष प्रविण चांदोरकर, सेक्रेटरी आशिष महाडीक, सहसेक्रेटरी निशांत महाडीक, खजिनदार स्वप्निल कांबळे, कार्याध्यक्ष संजय कपडेकर, कार्याध्यक्ष अनिल खिलारे, रोहिदास महिला मंडळ महाड अध्यक्ष शितल बिरवाडकर, उपाध्यक्ष जयश्री गोरेगावकर, सेक्रेटरी तेजश्री कांबळे, सहसेक्रेटरी कविता महाडीक, कार्याध्यक्ष संगिता महाडीक, मा. नगरसेवक प्रमोद महाडीक, अनिल पालकर सर, मयुर चांदोरकर, प्रविण चांदोरकर, शितल बिरवाडकर व जयश्री गोरेगावकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन गीतांजली महाडीक आणि स्वप्निल गोरेगावकर यांनी तर उत्सवप्रमुख संजोग म्हशिलकर, श्रीप्रसाद महाडीक, वैशाली धनंजय महाडीक व कविता महाडीक यांचे रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांच्या वतीने यांचे आभार मानले.



